Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 136:1-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 136:1-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
2 देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
3 प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
5 ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
6 ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
7 ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्र. 136 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी