Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 130:2-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 130:2-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
स्तोत्र. 130 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी