Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 126:1-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 126:1-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!
4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण.
5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
स्तोत्र. 126 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी