Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:88-129 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:88-129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

88 तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
89 हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
90 तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
91 त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
92 जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
93 मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
94 मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
95 दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
96 प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
97 अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
98 तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
99 माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
100 वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
101 तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
102 मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
103 तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
104 तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
105 तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
106 तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
107 मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
108 हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
109 माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
110 दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
111 तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
112 तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
117 मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
118 तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
119 पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
120 तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
121 मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
122 तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
123 तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
124 तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
126 ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
127 खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128 यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
129 तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी