Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:135-144 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:135-144 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

135 तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
136 माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
137 हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
138 तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
139 रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140 तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
141 मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
142 तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
143 मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
144 तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी