Text copied!
Bibles in Marathi

शास्ते 3:10-26 in Marathi

Help us?

शास्ते 3:10-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,
11 त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
12 पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याला इस्राएलावर सबळ केले, कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते हे याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.
13 तेव्हा एग्लोन राजाने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्राएलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले.
14 इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली.
15 परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली.
16 एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली
17 त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे भेट सादर केली; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
18 भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकांस त्याने निरोप दिला;
19 पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, “गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.”
20 एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला.
21 मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली;
22 पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती.
23 मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले.
24 तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.”
25 त्यांना मोठी काळजी वाटू लागली, आपण कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
26 सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईर येथे जाऊन पोहचला.
शास्ते 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी