Text copied!
Bibles in Marathi

शास्ते 20:30-34 in Marathi

Help us?

शास्ते 20:30-34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
31 तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
32 बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.”
33 सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी बआल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
34 सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
शास्ते 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी