Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 2:5-13 in Marathi

Help us?

लेवी. 2:5-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
6 त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय.
7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.
8 अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.
10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे.
11 खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
लेवी. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी