Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 25:32-44 in Marathi

Help us?

लेवी. 25:32-44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
34 लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
35 तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;
36 त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे.
37 तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.
38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
39 तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;
40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.
42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये.
43 तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
44 तुमच्या दासदासी; तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे.
लेवी. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी