Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 24:12-21 in Marathi

Help us?

लेवी. 24:12-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.
13 मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला,
14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारुन टाकावे.
15 तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जिवे मारावे.
17 जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे.
18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.
19 जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी.
21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
लेवी. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी