Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 23:26-35 in Marathi

Help us?

लेवी. 23:26-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.
28 त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
29 त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30 त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
32 तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
34 “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये.
लेवी. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी