Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 21:8-15 in Marathi

Help us?

लेवी. 21:8-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
11 त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
12 त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
13 मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
लेवी. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी