Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 17:4-10 in Marathi

Help us?

लेवी. 17:4-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
5 या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
7 आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हास पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
8 तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
9 तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्यास बाहेर टाकावे.
10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
लेवी. 17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी