Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 13:50-59 in Marathi

Help us?

लेवी. 13:50-59 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.
51 त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.
52 ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे.
53 परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
54 याजकाने लोकांस ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
56 परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
58 परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
लेवी. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी