Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 10:14-20 in Marathi

Help us?

लेवी. 10:14-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 “त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते;
18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”
19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
लेवी. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी