Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 10:1-4 in Marathi

Help us?

लेवी. 10:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;
2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”
4 अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
लेवी. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी