Text copied!
Bibles in Marathi

लूक 20:7-21 in Marathi

Help us?

लूक 20:7-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून, “तो कोणापासून होता हे आम्हास माहीत नाही.” असे त्यांनी त्यास उत्तर दिले.
8 मग येशू त्यास म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुद्धा तुम्हास सांगणार नाही.”
9 मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला.
10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले.
11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले.
12 तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले.
13 द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्यास मान देतील.’
14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’
15 त्यांनी त्यास द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील?
16 तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”
17 येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, “तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला.
18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
19 नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
20 तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले.
21 म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता.
लूक 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी