Text copied!
Bibles in Marathi

रोम. 15:7-13 in Marathi

Help us?

रोम. 15:7-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
8 कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,
9 आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
10 आणि पुन्हा तो म्हणतो की, ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’
11 आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’
12 आणि पुन्हा, यशया म्हणतो की, ‘इशायाला अंकुर फुटेल, आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’
13 आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
रोम. 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी