Text copied!
Bibles in Marathi

योहा. 8:27-37 in Marathi

Help us?

योहा. 8:27-37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही.
28 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो.
29 ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्‍या गोष्टी करतो.”
30 येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
32 तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”
33 त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?”
34 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.
35 दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत.
36 म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
37 मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता.
योहा. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी