Text copied!
Bibles in Marathi

योहा. 3:24-36 in Marathi

Help us?

योहा. 3:24-36 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
25 मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.
26 ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”
27 योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
28 मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
29 ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
30 त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
31 जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.
32 जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
33 ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे.
34 कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.
36 जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
योहा. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी