Text copied!
Bibles in Marathi

योहा. 21:4-11 in Marathi

Help us?

योहा. 21:4-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
5 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.”
6 आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.
7 तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.
8 आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
9 तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.
10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
11 तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
योहा. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी