Text copied!
Bibles in Marathi

योहा. 19:26-35 in Marathi

Help us?

योहा. 19:26-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.”
27 मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
28 मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले.
29 तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.
30 येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
31 तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे.
32 तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले.
33 परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत.
34 तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
35 आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.
योहा. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी