Text copied!
Bibles in Marathi

योहा. 17:15-21 in Marathi

Help us?

योहा. 17:15-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
16 जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.
17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
18 जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.
19 आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.
20 मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो
21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
योहा. 17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी