Text copied!
Bibles in Marathi

यहो. 6:21-26 in Marathi

Help us?

यहो. 6:21-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.
22 तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.”
23 तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई-वडीलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
24 मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.
25 यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
26 त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
यहो. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी