Text copied!
Bibles in Marathi

यहो. 21:6-24 in Marathi

Help us?

यहो. 21:6-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
9 त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
10 लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
11 त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
12 परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
13 त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
14 आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
15 होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
16 अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
17 बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
18 अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
19 अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
20 राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
21 त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
22 किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
23 दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
24 अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
यहो. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी