6 लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.
7 तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
8 मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
9 आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;
10 आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
11 गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
12 म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
13 तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
14 लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; “इस्राएलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे,” तेच त्यांचे वतन आहे;
15 परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
16 आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
17 हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ-बआल व बेथ-बालमोन;
18 आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
19 आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
20 बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
21 आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.