Text copied!
Bibles in Marathi

यहो. 13:22-31 in Marathi

Help us?

यहो. 13:22-31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.
23 तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.
24 गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
25 आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
26 आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;
27 आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
28 गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
29 आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
30 की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;
31 आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
यहो. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी