Text copied!
Bibles in Marathi

यहो. 11:11-18 in Marathi

Help us?

यहो. 11:11-18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
12 परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
13 टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
14 या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
16 अशा प्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलूख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
17 तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
18 त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
यहो. 11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी