21 याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
22 कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
23 कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
24 म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.