Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 23:18-29 in Marathi

Help us?

प्रेषि. 23:18-29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.
19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”
20 तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”
22 तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.”
23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”
24 आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.
25 शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले.
26 “महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम.
27 या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले.
28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.
29 तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
प्रेषि. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी