Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 21:15-35 in Marathi

Help us?

प्रेषि. 21:15-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो.
16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
17 आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
18 दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
19 पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे.
21 या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.
22 मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
25 जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.”
26 मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.
28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलाच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम शहरातील पाहिले होते, त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता, लोकांस वाटले, पौलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे.
30 सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली.
31 ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
33 मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
34 गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले.
प्रेषि. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी