Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 20:2-13 in Marathi

Help us?

प्रेषि. 20:2-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला.
3 त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.
4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया नगराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
5 ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस शहरात आमची वाट पाहू लागली.
6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
8 माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.
10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.”
11 मग पौल वर गेला, त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली, पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला.
12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.
प्रेषि. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी