Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 15:19-26 in Marathi

Help us?

प्रेषि. 15:19-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
20 तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.
21 कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
22 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
23 त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.
24 आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.
25 म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की,
26 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.
प्रेषि. 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी