Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 14:4-9 in Marathi

Help us?

प्रेषि. 14:4-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले.
5 काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
6 पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
7 आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.
8 लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता.
9 पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.
प्रेषि. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी