Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 11:19-26 in Marathi

Help us?

प्रेषि. 11:19-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली.
20 यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
21 प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
22 याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
23 बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
24 तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
25 जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
26 जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
प्रेषि. 11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी