21 म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते.
22 परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले पहिले कृत्य असे मला निर्माण केले.
23 अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
24 जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला;
25 पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला.
26 परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
27 जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.
28 जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले.
29 जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.
30 तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.
31 मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता.
32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.
33 माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका.
34 जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो.
35 कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो.