Text copied!
Bibles in Marathi

नीति. 7:4-11 in Marathi

Help us?

नीति. 7:4-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,
5 अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.
6 माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.
8 तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,
9 त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
10 आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
11 ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;
नीति. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी