2 मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.
3 जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
4 त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
5 ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
6 ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
7 ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
8 ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
9 ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.”
10 माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
11 मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
12 जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस.
13 शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.