Text copied!
Bibles in Marathi

नीति. 3:15-22 in Marathi

Help us?

नीति. 3:15-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
16 तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
17 तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.
18 जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
19 परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.
20 त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
21 माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
22 ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
नीति. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी