Text copied!
Bibles in Marathi

नीति. 29:12-15 in Marathi

Help us?

नीति. 29:12-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.
13 गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.
14 जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.
15 छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
नीति. 29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी