Text copied!
Bibles in Marathi

नीति. 26:11-16 in Marathi

Help us?

नीति. 26:11-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.
12 आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
13 आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे.
14 दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.
15 आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.
16 विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
नीति. 26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी