Text copied!
Bibles in Marathi

नीति. 25:18-27 in Marathi

Help us?

नीति. 25:18-27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.
19 संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.
21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे;
22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.
23 उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.
24 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे.
25 तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे.
26 जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे, तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे.
27 खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे.
नीति. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी