Text copied!
Bibles in Marathi

नीति. 23:9-17 in Marathi

Help us?

नीति. 23:9-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
10 जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
11 कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे; आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
12 तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13 मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
14 जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल.
15 माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
16 तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल.
17 तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
नीति. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी