Text copied!
Bibles in Marathi

नीति. 23:18-28 in Marathi

Help us?

नीति. 23:18-28 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे; आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20 मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
21 कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
23 सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
24 नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
25 तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
26 माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
27 कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
28 ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
नीति. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी