Text copied!
Bibles in Marathi

नीति. 22:5-17 in Marathi

Help us?

नीति. 22:5-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
6 मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
7 श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
9 जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
10 निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
11 ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
12 परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
13 आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
14 व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
15 बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
16 जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
17 ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
नीति. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी