Text copied!
Bibles in Marathi

नीति. 19:4-11 in Marathi

Help us?

नीति. 19:4-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
5 खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
6 उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
7 गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
8 जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
9 खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
10 मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
11 बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
नीति. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी