Text copied!
Bibles in Marathi

नीति. 12:21-25 in Marathi

Help us?

नीति. 12:21-25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात.
22 खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
23 शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
24 उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
25 मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
नीति. 12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी