Text copied!
Bibles in Marathi

नीति. 10:17-30 in Marathi

Help us?

नीति. 10:17-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे.
19 जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.
20 जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.
21 नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
22 परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
23 दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.
24 दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.
25 दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे.
26 जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
29 जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.
30 नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत.
नीति. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी