Text copied!
Bibles in Marathi

गीत. 2:2-7 in Marathi

Help us?

गीत. 2:2-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प, तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
3 (स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.
4 त्याने मला मेजवानीच्या घरात आणले, आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
5 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
6 (ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत आहे.
7 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की, आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
गीत. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी