Text copied!
Bibles in Marathi

गण. 26:9-19 in Marathi

Help us?

गण. 26:9-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
10 त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
13 जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
15 गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
16 आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
17 अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
18 गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
गण. 26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी